शनिवार, ३१ डिसेंबर, २०११
भूत...!
प्रवास इथला
काळाचा दूत
आजचा आज
उद्याचे भूत...!
शुक्रवार, ३० डिसेंबर, २०११
शूल...!
एकेका शब्दातून
व्यक्त एकेक शूल
हळव्याला प्रचीती
भटक्याला रानभूल...!
गुरुवार, २९ डिसेंबर, २०११
मीमांसा...!
नपुंसकाचे शील
दुर्बलाची अहिंसा
बकाचे ध्यान अन
वांझोटी
मीमांसा...!
बुधवार, २८ डिसेंबर, २०११
आत्मभान...!
दुष्टचक्राच्या वावटळीत
उरावे कसे आत्मभान
'मस्त चाललय आमचं...'
तारण ठेवलाय स्वाभिमान...!
रविवार, २५ डिसेंबर, २०११
बेट...!
क्रुसाचा काटेरी वसा
वेदनेला भिडणे थेट
जादुई पोतडीत आज
सापडावे करुणेचे बेट...!
शनिवार, २४ डिसेंबर, २०११
दुखवटा...!
कळपातला नव्हतोच कधी
ना चढविला कधी मुखवटा
त्यांच्या स्वयंभू क्षुद्रतेचा
मला का उसना दुखवटा...!
शुक्रवार, २३ डिसेंबर, २०११
जंतू...!
बेनाम चिंता
अक्षय किंतु
मनी मानसी
षडरिपूंचे जंतू...!
गुरुवार, २२ डिसेंबर, २०११
संदर्भ...?
नि:संदर्भलाही
संदर्भ नवे...
कसे झुलावे
क्षणासवे...?
बुधवार, २१ डिसेंबर, २०११
शून्य...!
तुझ्याशिवाय आयुष्य
एक पोकळ शून्य आहे
तुझ्याशिवाय माझ्यासाठी
प्रत्येकजण अन्य आहे...!
मंगळवार, २० डिसेंबर, २०११
स्वगत...!
उदासीनतेची परिसीमा
अन एकलेपणाची हद्द
संवाद हरवला कधीचाच
आता तर स्वगतही रद्द...!
सोमवार, १९ डिसेंबर, २०११
गुंथी...!
मनाचिये गुंथी
वेदनेचे ध्यान
आकळिता तत्व
व्यर्थ देहभान...!
गुरुवार, १५ डिसेंबर, २०११
मूल्य...!
कालबाह्य मूल्यांच्या अडगळीचा
कुणाला ठेवायचाय लेखा-जोखा
प्र-गतीच्या दिशाहीन झाकोळात
कुठली माउली अन कोण चोखा...!
मंगळवार, १३ डिसेंबर, २०११
मुमुक्षा...!
आदी तू मी आत्मज
संपूर्ण तू मी शून्यवत
क्षणिक माझी मुमुक्षा
तू चिरंतन तूच शाश्वत...!
सोमवार, १२ डिसेंबर, २०११
काडेपेटी...!
काडेपेटी मागतो येता-जाता
विडी-बिडी नाही, नाही नशा
पुष्कळ गोष्टी आहेत म्हणे
पेटवून टाकाव्यात अशा...!
रविवार, ११ डिसेंबर, २०११
द्वंद्व...!
आकाशी झेपावता पक्षी
डहाळी डहुळली जराशी
पाठवणी की आळवणी,
द्वंद्व कवटाळीत उराशी...!
शनिवार, १० डिसेंबर, २०११
विराणी...!
गर्द निळे निरभ्र आकाश
संथ खोल निश्चल पाणी
अश्राप जीवाचा एक हुंकार
उठता तरंग निळी विराणी...!
शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११
असणे...!
वृक्षवल्ली पशुपक्षी
स्वच्छंद वाहते झरे
'असण्या'चे भान नरा
येइतो आयुष्य सरे...!
गुरुवार, ८ डिसेंबर, २०११
बुद्ध...!?!
भावते वैराग्य आम्हा
मोहवितो शृंगारही
बुद्धाचे अनित्य तसा
मेनकेचा अंगारही...!
बुधवार, ७ डिसेंबर, २०११
विचक्षण...!
संभ्रमित थोडासा
थोडासा विचक्षण...
रात्रभर नाही सरला
गोठलेला एक क्षण...!
मंगळवार, ६ डिसेंबर, २०११
फाके...!
विरलेले जगण्याचे वस्त्र अन
उसवलेले जाणीवेचे टाके
मूल्यांचा अभद्र बाजार,
संवेदनेला रोजचेच फाके...!
सोमवार, ५ डिसेंबर, २०११
चला गया...!
मै जिंदगीका साथ
निभाता चला गया...
हर फिक्रको धुयेंमे
उडता चला गया...!
रविवार, ४ डिसेंबर, २०११
वेडाचार...!
कटीबद्ध जगरहाटी
सांभाळण्या 'सदाचार'
बदलाची अपेक्षादेखील
इथे शुद्ध वेडाचार...!
शुक्रवार, २ डिसेंबर, २०११
जीवात्मा...!
दृश्य-स्पर्श-गंध अन
अलवार सुखाची धुंदी
मुक्त स्वच्छंद जीवात्मा
क्षणिक मोहाचा बंदी...!
बुधवार, ३० नोव्हेंबर, २०११
'भाव'...!
सूर टिपेचा आवेश 'फोडो'
'साधने'ची छबी छानसी...
'देव' नावाचा कर्कश टाहो
'भाव' भलताच मनी मानसी...!
मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०११
शिकस्त...!
अंतर्मनात संदिग्धता मात्र
प्रकट अविर्भाव नेमस्त...
जळीस्थळी काष्ठीपाषाणी
सुखाच्या शोधाची शिकस्त...!
सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११
न-व्यास...!
माणुसकीचा इतिहास रक्तरंजित झाला
जगाचा भूगोल बदलण्याच्या हव्यासात
वाल्मिकीला वाल्याच व्हावे लागेल
त्रीज्यांच्या युतीने बनलेल्या न-व्यासात...!
रविवार, २७ नोव्हेंबर, २०११
विश्वेश्वर...!
व्यथेलाही आवाज असतो
नक्कीच असतो नाद-स्वर
उमजण्याकरिता मात्र तो
ध्यानीमनी हवा विश्वेश्वर...!
शनिवार, २६ नोव्हेंबर, २०११
निशां...?
शहीदौंकी चिताओंपर
लगेंगे हर बरस मेले
वतनपें मिटनेवालौंका
यहिं बाकी निशां होगा...?
शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११
नांदी...!
भ्रष्ट-पुष्ट कोडगे ने-ते
उद्विग्न अराजकाची नांदी...
अविवेकी
बेताल माध्यमे
कानकोंडे दुसरे 'गांधी'...!
गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११
भक्ती...!
भोळ्या भक्ताच्या भावाला
गरज नाही सक्तीची...
संधीसाधूंच्या सोंगाला
ओळख नाही भक्तीची...!
बुधवार, २३ नोव्हेंबर, २०११
बेसूर...!
अधीर अन आतुर
लुब्ध अन चतुर
कशी जमावी मैफल
सूर-न-सूर बेसूर...!
मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०११
अभोगी...!
हे असेच आहे काही
अभोगी आयुष्य माझे
नसण्याचे दु:ख रिकामे
असण्याचे सुंदर ओझे...!
कवयत्री...?
सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११
मर्त्य ...!
काही काळ तरी जगावे
नि:संदर्भ अन निर्हेतुक
अमूर्त या चिरंतनात
मर्त्य जीव आगंतुक...!
रविवार, २० नोव्हेंबर, २०११
क्षण...!
आला क्षण गेला क्षण
जगला क्षण तगला क्षण
भूत-भविष्याने भंजाळलेली
वर्तमानाची वांझोटी वणवण...!
गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०११
अहं...!
उर्मी अन बेभान मदहोशी
की गरज, उरक अन उपचार
'त्री'रीपुंच्या
मायाजालात
स्खलन'शील' अहं लाचार...!
सोमवार, १४ नोव्हेंबर, २०११
विशुद्ध...!
निरागस बाल्य-निर्हेतुक हास्य
उदंड विश्वास अन कोवळी स्वप्ने
आकांक्षेला मिळो विवेकी दृढता
जतन होवो निर्मल-विशुद्ध मने...!
रविवार, १३ नोव्हेंबर, २०११
खूळ...!
निखळ नि:स्पृहतेला
प्रसिद्धीचे खूळ
उन्नतीच्या पोटी
दांभिकतेचा शूळ...!
शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०११
उन्मनी...!
तुझ्या असण्यात
तुझ्या
नसण्यात
तुझ्या हसण्यात
तुझ्या रुसण्यात
...
धुंद मनपाखरू उडे रानीवनी
तुझ्या उन्मनी बरसण्यात...!
मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०११
प्रश्न...!
आताशा बुडणा-या सूर्याला
'बराय उद्या भेटू...'
असे म्हणालो कि तो मला म्हणतो,
'कशावरून?
मधल्या रात्रीची तुला अजूनही इतकी खात्री आहे?'
सूर्य आता म्हातारा झालाय...!
- एकमेवाद्वितीय
पुल
अन्य कोण...?
सोमवार, ७ नोव्हेंबर, २०११
चोच...!
भ्रमिष्ट वैराग्याला
आसक्तीची बोच
स्वयंभू पिंडाला
षडरिपुंची चोच...!
रविवार, ६ नोव्हेंबर, २०११
अविभक्त...!
नामाचा
गजर
इंद्रायणीकाठी
संतांची मांदियाळी
भावसंपृक्त...
I
सुंदर ते ध्यान
कटीवर हात
उभा
विटेवर
अविभक्त...
I
I
शनिवार, ५ नोव्हेंबर, २०११
पहारा...!
अलवार सुखाची धुंदी
अन चित्तवृत्तींचा शहारा...
उत्तररात्री ग्लानीत
मुग्ध
निजेवर
भ्रमाचा
पहारा...!
शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०११
खेळ-खंडोबा...!
खेळात म्हणे चालायचेच,
'नवा गडी नवा राज'...
संदर्भ सोयीस्कर नवे
खेळ-खंडोबा सगळा आज...!
गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०११
लक्षण...!?!
अनीतीने द्रव्य जोडी,
धर्म नीती न्याय सोडी,
संगतीचे मनुष्य तोडी,
तो येक मूर्ख
- समर्थ रामदास
बुधवार, २ नोव्हेंबर, २०११
स्नेहमिलन...!
नेहमीच घडो स्नेहमिलन ज्यात
भेटीचे सुख तरी हरविल्याची खंत
उल्हास, रोमांच आणि भावनावेग
उत्कट या क्षणांसाठी पुन्हा मिळो उसंत...!
शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०११
भवेत...!
दिवा वा यदि वा रात्रो
विघ्न्शान्तिर्भविष्यति
I
नर नारी नृपाणान्च
भवेत दु:स्वप्ननाशनंम
II
गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०११
पाडवा...!
पहाटवारा उटण्याचा सुगंध
कोमल स्पर्श अन अभ्यंग
सुरेल स्वरांची साथसोबत
गौरव
सहजीवनाचा अभंग...!
बुधवार, २६ ऑक्टोबर, २०११
सचोटी...!
गजान्त वैभव
सोन्याचे पाऊल
सचोटीच्या दारी
लक्ष्मिची चाहूल...!
मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०११
विश्वप्रार्थना...!
हर्ष-खेद, उन्माद-विवेक
विषाद आणि वंचना...
'तमसोमाज्योतीर्गमय'
एवढीच विश्वप्रार्थना...!
सोमवार, २४ ऑक्टोबर, २०११
प्रदीप...!?!
दारी रांगोळी गगनी दिवा
रीत जुनी उन्मेष नवा
तमाने प्रदीप ल्यावा
सौहार्द्राचा मंत्र व्हावा...!
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)