सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३

समय...!

 
मनुष्य बली होत नहीं
समय होत बलवान…
भिल्लन लुटी गोपिका
वहीं अर्जुन वहीं बाण…!

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१३

जाणता राजा...!

 

निश्चयाचा महामेरु, बहुत जनांस अधारु | 
अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी || १ ||

परोपकाराचिया राशी, उदंड घडती जयाशी |
जयाचे गुणमहत्वाशी, तुलना कैशी || २ || 

नरपति हयपति, गजपति गडपति | 
पुरंधर आणि शक्ति, पृष्ठभागी || ३ || 

यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत | 
पुण्यवंत आणि जयवंत, जाणता राजा || ४ || 

आचारशील विचारशील, दानशील धर्मशील | 
सर्वज्ञपणे सुशील, सर्वाठायी || ५ || 

धीर उदार सुंदर, शुरक्रियेसी तत्पर | 
सावधपणेसी नृपवर, तुच्छ केले || ६ ||

तीर्थक्षेत्रे ती मोडिली, ब्राम्हणस्थाने बिघडली | 
सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला || ७ || 

देवधर्म गोब्राम्हण, करावयासी रक्षण | 
हृदायस्त झाला नारायण, प्रेरणा केली || ८ || 

उदंड पंडित पुराणिक, कविश्वर यज्ञिक वैदिक | 
धूर्त तार्किक सभानायक, तुमचे ठायी || ९ ||

या भूमंडळाचे ठायी, धर्म रक्षी ऐसा नाही | 
महाराष्ट्रधर्म राहिला काही, तुम्हा करीता || १० ||

आणखी काही धर्म चालती, श्रीमंत होउनी कित्येक असती |
धन्य धन्य तुमची कीर्ति, विस्तारली || ११ ||

कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकांस धाक सुटले |
कित्येकांसी आश्रय झाले, शिवकल्याण राजा || १२ ||

तुमचे देशी वास्तव्य केले, परन्तु वर्त्तमान नाही घेतले |
ऋणानुबन्धे विस्मरण जाहले, बा काय नेणु || १३ ||

सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ति, सांगणे काय तुम्हा प्रति |
धर्मास्थापनेची कीर्ति, सांभाळली पाहिजे || १४ || 

उदंड राजकारण तटले, तेथे चित्त विभागले | 
प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे || १५ || 

- समर्थ रामदास स्वामी

सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१३

सप्रेम..!

 
ज्यांना मानवत नाही
माझे असणे थेट
त्यांना माझे नसणे
सप्रेम भेट...!

रविवार, १७ फेब्रुवारी, २०१३

तरीही...!

 
कालच्या रात्रींना अजून
 
पारिजातकाचा गंध
 
गलीत-गात्रांना तरीही
 
उसासण्याचा छंद...!

शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१३

वसंतपंचमी...!

 
जे वाटती अतूट
जाती तुटून धागे,
आधार जो ठरावा
त्यालाच कीड लागे...
ऋतू कोवळा अखेरी
तळत्या उन्हात जळतो
तरीही वसंत फुलतो,
तरीही वसंत फुलतो...!

- सुधीर मोघे
(परममित्र दिनेशच्या सौजन्याने)

रविवार, १० फेब्रुवारी, २०१३

शोध...!


 कोहंचा शोध इथला
आदीपासून अंतापर्यंत
अस्तित्वाचा भोग हा
असण्यापासून नसण्यापर्यंत...!

मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१३

द्वाड...!

 
मनच माझे द्वाड हे
 
जे कुठेच नाही रमत
 
कि ही जगण्याची कला
 
जी मलाच नाही जमत...!