रविवार, २६ जून, २०१६
मैत्र...!
ते धुके अवेळी होते
की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या
निष्पर्ण तरुंची राई...!
सखा सन्मित्र दिनेशला वाढदिवसाच्या भावविभोर गूढरम्य शुभेच्छा!
शब्द: ग्रेस
गुरुवार, २३ जून, २०१६
भाषा...!
अश्रूंची भाषा कळे तो
पापणी भिजून ओली
विखुरल्या जगण्यास त्या
ना संवेदना ना खोली...
रविवार, ५ जून, २०१६
शांतता...!
सहज संयत सोज्वळ सुलभ
अभिनयाची मुग्ध परिभाषा…
असिधाराव्रताची सांगता होता
दाटून येती कंठ, नभ अन दिशा…!
अभिनयाचे एकमेवाद्वितीय उत्तुंग आणि मृदुल विद्यापीठ असलेल्या सुलभाताईंना भावपूर्ण शब्दसुमनांजली!
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)