संवेदनेची झुलू लागली डहाळी
प्रयासे नित्य जोजवली संवेदना
लाभण्या कल्पनेस मूर्त झळाळी
अमूर्त भासे जे अशक्यही कधी
साकारेल खचित हा ध्यास हवा
लांघण्या वेस मर्यादेची, केवळ
श्वास नको अढळ विश्वास हवा
स्वप्ने लाभो मनुष्या अन सामर्थ्यही
साकारण्या रोमांचक सुखचित्र नवे
अन प्रगती'शील' माणसा आकळो
सुखेनैव जगण्यास नेमके काय हवे.