रविवार, १० जुलै, २०११
मर्म...!
आपला स्वार्थ जपणे
इथल्या प्रत्येकाचा धर्म आहे...
मी - माझे - मला
एव्हढेच यांच्या जगण्याचे मर्म आहे...!
बुधवार, ६ जुलै, २०११
समर्पण...!
हुतात्म्यांची नावं रस्त्यांना देण्यात
न जाणो कोणती भावना आहे...
त्यांच्या रस्त्याने जातो म्हणणे
ही समर्पणाची शुद्ध संभावना आहे...!
मंगळवार, ५ जुलै, २०११
घर...!
घर हे स्वप्नरंजन नव्हे
तर एक संकल्पना असते...
मांडली तर भातुकली,
विस्कटली तर वल्गना असते...!
रविवार, ३ जुलै, २०११
अमावस्या...!?!
एकटेपणाची परिसीमा
त्या दिवशी घडली...
अमावस्या आली म्हणून
रात्र माझ्यासवे रडली...!
शुक्रवार, १ जुलै, २०११
अनुनय...!?!
साथ हा शब्द
खरा मजेदार आहे...
मागितली तर अनुनय,
मिळाली तर बहार आहे...!
बुधवार, २९ जून, २०११
साथ...!?!
प्रत्येकाला वाटचालीत
साथ ही हवीच असते...
प्रवासाच्या सुरवातीला
प्रत्येक वाट नवीच असते...!
मंगळवार, २८ जून, २०११
हमी...!?!
काही काही भावनांचे
जाणीव मूल्य कमी भरते...
विश्वास लिहून दाखविला
की ती हमी ठरते...!
सोमवार, २७ जून, २०११
पत्र...!?!
पत्र म्हणजे...
वैशाखातला अवचित गारवा
ठुमरीनंतर आळवलेला
मैफिलीतला मारवा...!
रविवार, २६ जून, २०११
अनुबंध...!?!
शुभेच्छेच्या फुलांना
दुराव्याचा गंध
भेटीमुळे होतात
दृढ अनुबंध...!
शनिवार, २५ जून, २०११
निरंतर...!?!
नदीच्या काठावर बसलो तेव्हा
वाटले, पाणी किती छान आहे...
निरंतर वहात असते म्हणून
जगण्याचे त्याला भान आहे...!
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)