मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०११

दीक्षा...!


तुझ्याशिवाय जगणं

जणू एक शिक्षा आहे...

आयुष्य म्हणजे तुझा अभ्यास

तू दिलेली दीक्षा आहे...!

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०११

गाभारा...!


अपेक्षांचे ओझे अन

जाणीवेचा धुमारा

भरगच्च मनाचा

रिकामा गाभारा...!

रविवार, १६ ऑक्टोबर, २०११

सरी...!


कधी कधी

कुठेतरी...

गर्भरेशमी घननिळ्या

सरी वर सरी...!

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०११

अक्षरप्रिती...!


तुझी नि माझी अक्षरप्रिती

कधी कुणीही केली नव्हती...

अनवट या अक्षत वाटेवर

तू माझी मी तुझा सांगाती...!

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०११

उपेक्षा...!


फुलाने फक्त दरवळावं

ही प्रत्येकाची अपेक्षा...

रंगाबद्दल औदासिन्न्य

ही फुलाची खरी उपेक्षा...!

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०११

बाणा...!


भावनांचे भरीस

भूमिकेची कुचंबणा

मन नाही कह्यात अन

स्वाभिमानी बाणा...!

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०११

स्पर्श...!


उल्हास, उन्मेष, अनुभूती

प्रवास, जल्लोष अन हर्ष...

ओसंडत्या भावनांचा पूर

तरी जाणीवेला द्रोहाचा स्पर्श...!

बुधवार, ५ ऑक्टोबर, २०११

गंध...!


कधी कधी माझ्या श्वासाला

तुझा गंध जाणवतो...

अन एकट्या जाणीवेने

वेडा डोळा पाणावतो...!

रविवार, २ ऑक्टोबर, २०११

छंद...!


संभावितांच्या गप्पात

भ्रष्टाचार निंद्य आहे...

गांधीवादावर 'बोलण'

आमचा मनस्वी छंद आहे...!

शनिवार, १ ऑक्टोबर, २०११

हितेच्छू...!


त्यांच्या या दुनियेत

परका मी झालो आहे...

'हितेच्छू'च्या भाऊगर्दीत

पोरका मी झालो आहे...!