सोमवार, १२ डिसेंबर, २०११
काडेपेटी...!
काडेपेटी मागतो येता-जाता
विडी-बिडी नाही, नाही नशा
पुष्कळ गोष्टी आहेत म्हणे
पेटवून टाकाव्यात अशा...!
रविवार, ११ डिसेंबर, २०११
द्वंद्व...!
आकाशी झेपावता पक्षी
डहाळी डहुळली जराशी
पाठवणी की आळवणी,
द्वंद्व कवटाळीत उराशी...!
शनिवार, १० डिसेंबर, २०११
विराणी...!
गर्द निळे निरभ्र आकाश
संथ खोल निश्चल पाणी
अश्राप जीवाचा एक हुंकार
उठता तरंग निळी विराणी...!
शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११
असणे...!
वृक्षवल्ली पशुपक्षी
स्वच्छंद वाहते झरे
'असण्या'चे भान नरा
येइतो आयुष्य सरे...!
गुरुवार, ८ डिसेंबर, २०११
बुद्ध...!?!
भावते वैराग्य आम्हा
मोहवितो शृंगारही
बुद्धाचे अनित्य तसा
मेनकेचा अंगारही...!
बुधवार, ७ डिसेंबर, २०११
विचक्षण...!
संभ्रमित थोडासा
थोडासा विचक्षण...
रात्रभर नाही सरला
गोठलेला एक क्षण...!
मंगळवार, ६ डिसेंबर, २०११
फाके...!
विरलेले जगण्याचे वस्त्र अन
उसवलेले जाणीवेचे टाके
मूल्यांचा अभद्र बाजार,
संवेदनेला रोजचेच फाके...!
सोमवार, ५ डिसेंबर, २०११
चला गया...!
मै जिंदगीका साथ
निभाता चला गया...
हर फिक्रको धुयेंमे
उडता चला गया...!
रविवार, ४ डिसेंबर, २०११
वेडाचार...!
कटीबद्ध जगरहाटी
सांभाळण्या 'सदाचार'
बदलाची अपेक्षादेखील
इथे शुद्ध वेडाचार...!
शुक्रवार, २ डिसेंबर, २०११
जीवात्मा...!
दृश्य-स्पर्श-गंध अन
अलवार सुखाची धुंदी
मुक्त स्वच्छंद जीवात्मा
क्षणिक मोहाचा बंदी...!
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)