रविवार, १७ फेब्रुवारी, २०१३

तरीही...!

 
कालच्या रात्रींना अजून
 
पारिजातकाचा गंध
 
गलीत-गात्रांना तरीही
 
उसासण्याचा छंद...!

शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१३

वसंतपंचमी...!

 
जे वाटती अतूट
जाती तुटून धागे,
आधार जो ठरावा
त्यालाच कीड लागे...
ऋतू कोवळा अखेरी
तळत्या उन्हात जळतो
तरीही वसंत फुलतो,
तरीही वसंत फुलतो...!

- सुधीर मोघे
(परममित्र दिनेशच्या सौजन्याने)

रविवार, १० फेब्रुवारी, २०१३

शोध...!


 कोहंचा शोध इथला
आदीपासून अंतापर्यंत
अस्तित्वाचा भोग हा
असण्यापासून नसण्यापर्यंत...!

मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१३

द्वाड...!

 
मनच माझे द्वाड हे
 
जे कुठेच नाही रमत
 
कि ही जगण्याची कला
 
जी मलाच नाही जमत...!

बुधवार, ३० जानेवारी, २०१३

कद्रू...!

 
पाप-पुण्याचे हिशोबही
 
कद्रूपणेच करता
 
मृत्युच्या विवंचनेत
 
जगणे गृहीत धरता...!

मंगळवार, २९ जानेवारी, २०१३

खेळ...?

 
मी मरायला निघालो तेव्हा
 
म्हणाले जगण्याचे काय घेशील
 
जगण्याचा खेळ मांडला तर
 
विचारता आम्हाला काय देशील...?

सोमवार, २१ जानेवारी, २०१३

घोळ...!

 
गंधस्पर्शित रात्र प्रहरी
 
गोठल्या थेंबांची ओळ
 
मुग्ध-क्लांत गात्र लहरी
 
भोग-विरक्तीचा घोळ...!

रविवार, २० जानेवारी, २०१३

ठसे...?

 
निषिद्ध एके काळी ते
 
होते स्वीकार्य कसे
 
मीच नाही पूर्वीचा की
 
हे काळाचे ठसे...?

शुक्रवार, १८ जानेवारी, २०१३

ओझे...!

 
गतानुगतिक प्रवासात
 
थांबू म्हटले क्षणभर
 
विमनस्क देहमनाला
 
सावलीचे ओझे मणभर...!

गुरुवार, १७ जानेवारी, २०१३

आदिम...!

 
जाणिवांच्या पलीकडे
 
अनोखे विश्व वसलेले
 
आदिम प्रेरणांना मात्र
 
वासनांध सर्प डसलेले...!