या पावसाळ्यात,
आरशावर ठिबकणाऱ्या
वळीवाच्या थेंबांनी मला कधीच सांगितलंय
या पावसाळ्यात घर बांधायचं नाही...
तेव्हा आता थुई थुई पावसात भिजवीण्यापेक्षा,
तुझ्या पावलांवर अळीव्याची नक्षी काढ...
...नाही, पाऊस तोच आहे, मातीही तीच आहे,
आणि तुझ पाऊलही...
फक्त आताशा,
माझ्या हातात माती ओल धरत नाही...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा