जेत्यांचा इतिहास घडविण्याच्या नादात
जगाचा भूगोल बदलतो राहतो सतत
आणि घटना-पुनर्लेखनाच्या कर्मठपणात
परंपरेची जळमटं लटकत राहतात...
गैरसोयीच्या गोष्टींपासून पळ काढण्यासाठी
नामांतराने विषयांतर साधत असेल,
पण म्हणून लोकसंख्येच्या विस्फोटाने
लोकशाही समृद्ध होत नसते...
तरीही, वंशसातत्य या महत्वाच्या विषयात,
शेजाऱ्याला मागे टाकून आपण पहिला नंबर काढला
आणि एकादशीच्या घरी शिवरात्र बोलावली
या सांस्कृतिक उत्थानाचे झेंडे मिरवू नये...
...असे काही नाही !