शुक्रवार, ११ मार्च, २०१६
मंगळवार, ८ मार्च, २०१६
८ मार्च
विश्वाची निर्मिती की विश्वनिर्माती तू
आदिमाया की सर्व शक्ती भक्ती तू
जगण्याचा मूळ स्त्रोत बीजवासिनी
की पूजण्याची सवाष्ण सुवासिनी तू
जगा रक्षिण्या प्रकटली ती काली तू
की त्यांच्या विलासाची भोगदासी तू
धर्मकर्मास वाहिलेली अखंड बंदिनी
की विद्याप्रचुर अष्टावधानी नंदिनी तू
उत्सवासाठी सजवली लक्ष्मीगौरी तू
की रहाटगाडग्यास जुंपलेली भैरी तू
आई, बहीण, लेक, सखी, अर्धांगिनी
की स्वयंपूर्ण आत्मसिद्ध कामिनी तू
सहनशीलतेची परिसीमा सेवाव्रती तू
की मनूजाच्या धारणेची नित्य क्षती तू
सर्वसंगपरित्यागी मीरा, रण-रागिणी
की लखलख चमकणारी दामिनी तू
महिषासुरमर्दिनी दुर्गा, प्रेममयी राधा तू
मंत्री-दासी-रंभा क्षणी की नित्य माता तू
भूमातेची लेक तू सर्वव्यापी गजगामिनी
तुझ्या तनमनधनाची स्वयंभू स्वामिनी तू
उत्पत्तीचा बीजमंत्र, अनादी अनंताचा प्रवाह
आणि सर्व धारणेचा निर्वाह अशा स्त्रीत्वास प्रणाम!
आदिमाया की सर्व शक्ती भक्ती तू
जगण्याचा मूळ स्त्रोत बीजवासिनी
की पूजण्याची सवाष्ण सुवासिनी तू
जगा रक्षिण्या प्रकटली ती काली तू
की त्यांच्या विलासाची भोगदासी तू
धर्मकर्मास वाहिलेली अखंड बंदिनी
की विद्याप्रचुर अष्टावधानी नंदिनी तू
उत्सवासाठी सजवली लक्ष्मीगौरी तू
की रहाटगाडग्यास जुंपलेली भैरी तू
आई, बहीण, लेक, सखी, अर्धांगिनी
की स्वयंपूर्ण आत्मसिद्ध कामिनी तू
सहनशीलतेची परिसीमा सेवाव्रती तू
की मनूजाच्या धारणेची नित्य क्षती तू
सर्वसंगपरित्यागी मीरा, रण-रागिणी
की लखलख चमकणारी दामिनी तू
महिषासुरमर्दिनी दुर्गा, प्रेममयी राधा तू
मंत्री-दासी-रंभा क्षणी की नित्य माता तू
भूमातेची लेक तू सर्वव्यापी गजगामिनी
तुझ्या तनमनधनाची स्वयंभू स्वामिनी तू
उत्पत्तीचा बीजमंत्र, अनादी अनंताचा प्रवाह
आणि सर्व धारणेचा निर्वाह अशा स्त्रीत्वास प्रणाम!
सोमवार, ७ मार्च, २०१६
रविवार, ६ मार्च, २०१६
सहजीवन...!
संसाराचे असिधारा व्रत
चरैव इति होता गुरुमंत्र…
जगणे त्यांना कळले हो
सन्मित्र मिलिंद आणि त्यांच्या संकल्पाचे मूर्त स्वरूप सौ. सुजाता क्षीरसागर या जगावेगळ्या, सर्वस्वी अनुरूप दांपत्यास सहजीवनाच्या आणखी एका वर्षपूर्ती बद्दल सस्नेह… या व्रतस्थ दंपतीने विवाहाचा सुवर्ण आणि अमृतच नव्हे तर हिरक महोत्सवही साजरा करावा ही मनस्वी सदिच्छा!
मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१६
शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६
सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६
रिक्त...!
जगण्याचे मर्म उमजते जेव्हा
असणे माझे ती निमूट साहते…!
भरले वाटते सर्व व्रण तेव्हा
जखम आतून संतत वाहते…
खुळावतो नादही पाहण्याचा
पाहणे माझे ती हळूच पाहते…
शुष्क झालेल्या वाटांची बेगमी
कधी अचानक नक्षत्रात नाहते…
अन भासलो कधी रिक्त तरी
गुंतणे 'मना'चे भरून राहते…
जगण्याचे मर्म उमजते जेव्हा
असणे माझे ती निमूट साहते…!
शुक्रवार, १५ जानेवारी, २०१६
संक्रमण...?
गुळावर तिळाची
व्हर्च्युअल भक्ती,
व्हॉट्सऍप संक्रमणात
गोड बोलण्याची सक्ती…
सर्व व्हॉट्सऍप तथा समस्त व्हर्च्युअल वर्कर्सना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
आणि संक्रमणाच्या निमित्ताने वैभवच्या शब्दात एक (प्र?)वचन…
तुम्ही व्हॉट्सऍपवर आहात ना...?
...मग मी तुमचा आहे!
मी तुम्हाला रोज सकाळी फुलं पाठवेन, श्लोक पाठवेन…
वारंवार माझा डीपी बदलून या क्षणी मी कसा आहे ते दाखवेन!
मी पिंग करेन, नज करेन,
अहोरात्र तुम्हाला जज करेन…
तुम्ही कुठलाही मेसेज फॉर्वर्ड केलात
की मी वाचण्याआधी छान म्हणेन,
त्या ओळी तुमच्या स्वत:च्या असतील तर महान म्हणेन…!
सतत नमस्कार, सतत हसरा चेहरा, 24x7सस्मित सेवा…
पण तुम्ही व्हॉट्सऍप वर आहात ना…? हां… मग मी तुमचा आहे…!
मी शॉर्ट बोलतो पण स्वीट बोलतो,
मला पूर्ण शब्द टाईप करायचा वीट येतो…
मला कानामात्रा, वेलांटी, उकार यांच्याशी घेणं देणं नाही…
म्हणणं कळल्याशी मतलब, हं स्मायली चुकली नाही पाहिजे
नाहीतर मात्र गहज़ब!
मी सर्व गृपमधे हजर आहे,
माझी सगळ्यांच्या वाढदिवसांवर नजर आहे…
मला माहीत नाही हे बरोबर की चूक आहे,
पण मी सर्वात आधी RIP लिहायला उत्सुक आहे…!
मला अहोरात्र हे सिध्द करायचं आहे
की प्रत्येक विषयावर मला ओपिनियन आहे,
मी एकटाच नाही माझ्यासोबत
व्हॉट्सऍपवरचा प्रत्येकजण आहे…!
मी व्हर्चुअल लाटांसाठी व्हर्चुअल किनारा…
मी इथेच असतो, कुठे कुठे जात नाही,
ही गर्दी खरी… ख-या गर्दीत ती बात नाही…!
ही माणसं, ह्या आयडीज, हे स्टेटस मेसेजेस
हेच माझं विश्व आहे…
एकदां माझं म्हटल्यावर कोण बघत बसतो
कोण दीर्घ आणि कोण ऱ्हस्व आहे…!
ही माझी एक्स्टेंडेड फॅमिली आहे…
हल्ली यातच माझी ओरिजिनल फॅमिली सामावली आहे!
हां , तिचा एक वेगळा असा ग्रुप आहे…
पण का होईना आम्हाला अजून एकमेकांचं अप्रूप आहे…!
त्यात आई आहे, ताई आहे
आणि आयुष्यात कधीही प्रत्यक्ष न भेटलेले
रक्ताचे अनेक नातेवाईक आहेत
पण त्यांनाही भेटू कधीतरी… काय घाई आहे…!
सध्या श्वास घ्यायला वेळ नाही,
इतकी माणसं जपायची म्हणजे पोरखेळ नाही…
नाही म्हणायला अधून मधून डोळे दुखतात, बोटं दुखतात…
मन 'बास झालं हे खोटं जग' म्हणत आभासी वेशीवर अडतं
पण पुढच्याच क्षणी फोनवरती देवदर्शन घडतं…!
पाठोपाठ येतात अनेक पायरेटेड भक्तीरसपूर्ण गाणी…
देवाची करणी अन नारळात पाणी…!
मग मी प्रसन्न मनाने ती विंडो मिटतो
आणि इतर विंडोत तोच देव पेस्ट करत सुटतो…!
मी इथेच असतो, मी फक्त इथलाच आहे…
पण तुम्ही व्हॉट्सऍप वर आहात ना…?
हां…मग मी तुमचाच आहे…!
बुधवार, ३० डिसेंबर, २०१५
लाजरा...!
राजेंद्रकुमार ते सुनील दत्त असल्या न-नटांचे पडद्यावरील दर्शन जिच्या चेहऱ्यातल्या गोडव्याने आणि सहज अभिनायातल्या नजाकतीने सुसह्य केले ती '…बहारोंकी मलिका…' पडद्याआड जात नाही तोवर 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा'यला आसुसलेला कवि ज्याचा '… तुमचं आमचं सेम असतं…' हा विश्वास आम्हाला मजनू व्हायची हिम्मत देऊन गेला… त्यानेही त्याच्या कवितेइतक्याच सहजतेने निरोप घेतला. दृश्यानुभव जरी संग्रहित स्वरुपात शिल्लक असला तरी जिवंत श्रवणानुभव आता पुन्हा नाही आणि पु. लं. चे किस्से 'पीएल असा होता…' सांगणारा आम्ही प्रत्यक्ष पाहिलेला शेवटचा माणूसही…
यांनी आम्हांस काय दिले याची जंत्री मोठी असली तरी एका शब्दात सांगायचे तर… आनंद!
आमचे जगणे अनेक तऱ्हेने समृध्द करून गेलेल्या या दोन कलावंतास शब्दसुमनांजली…
आमचे जगणे अनेक तऱ्हेने समृध्द करून गेलेल्या या दोन कलावंतास शब्दसुमनांजली…
शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५
गीत...!
शनिवार, दि. १९ डिसें. २०१५ ला एस-ओ-एस व्हिलेज पुणे आयोजित
करिअर फ़ेअर मध्ये युवामनाच्या 'हौसला अफजाई' साठी केलेली रचना…
सौदा
इथे सगळ्याचाच
काहीच
मिळत नसते फुकट,
यशाला
नसतो शॉर्ट-कट
अन
वाट
सत्याची नेहमीच बिकट…
गुंड
असतात मुळात भ्याड
सूज्ञ
जमवीत नाहीत झुंड,
अन्यायाविरुध्द
कुठल्याही
अन
निर्भयतेने थोपट दंड…
कधी
उन तर पाऊस
कधी
चुकणार
ना सृष्टीचे चक्र,
ग्रह-ताऱ्यांना भुलू नकोस
कोण मार्गी, कुठला
वक्र…
देव-दानव कुणि
नको
निर्लेप
जग आयुष्य,
दोघांनाही
असूयेने
वाटू
दे, व्हावे मनुष्य…!
प्रत्येक
क्षणातून तू
शिकून
घे नवे काही,
आला
क्षण गेला क्षण
हा
क्षण फिरुनी नाही…
निर्धारांना
चढव धार
प्रयत्नांचे
इमले रच,
कितीही
वाटले कठीण
खाऊ
नको मुळी कच…
स्वप्न
बघ आभाळाचे
अन
घे गरुडभरारी,
निवडलेल्या
वाटेवरून
फिरू
नकोस माघारी…
अंधार
कितीही दाटला तरी
रात्र
संपून पहाट होईल,
रोज
नव्याने उगवून सूर्य
गीत
वसुंधरेचे गाईल…!
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)










