गुरुवार, २१ मे, २०१५
मंगळवार, १९ मे, २०१५
अरुणाष्टके...!
जळत ह्रदय माझें कोट्यानुकोटी।
मजवरि करुणेचा राघवा पूर लोटीं॥
तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू।
षड्रिपुकुळ माझें तोडि याचा समंधू ॥
जननिजनकमाया लेंकरूं काय जाणे।
पय न लगत मूखीं हाणिता वत्स नेणे॥
जळधरकण आशा लागली चातकासी।
हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥
विश्रांति देहीं अणुमात्र नाहीं।
कुळाभिमानें पडिलों प्रवाहीं॥
स्वहीत माझें होतां दिसेना।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥
मानवतेच्या अविरत सेवेसाठी परिचारिकेचे असिधारा व्रत स्वीकारलेल्या पण बधीर समाजाच्या सडक्या मनोवृत्तीमुळे नरकयातना भोगणाऱ्या अरुणा शानभाग यांचे काल लौकिक अर्थाने निधन झाले…
मृत्यूशी ४२ वर्षे लढणाऱ्या आणि त्यांच्या त्या अवस्थेत समाजभान, सहानुभूती आणि विवेक जागृत ठेवून ऋणानुबंध जपणाऱ्या त्यांच्या सर्व परिचारिका भगिनींना… सलाम!
बुधवार, ८ एप्रिल, २०१५
कोहम्...!
मर्यादापुरुषोत्तम राम की
भोळा कोपिष्ट रुद्र मी…
दशांगुळे शेष वामन की
रज:कणासंम क्षुद्र मी?
भीष्म धर्म अभिमन्यू की
शापित धुरंधर द्रोण मी…
स्वच्छंदी की स्वपराजित
मलाच न ठावे कोण मी?
कृष्णाचा तो अर्जुन की
लक्ष्य त्याचे कर्ण मी…
वृक्षाचा घनगर्भ घेर की
लाजाळूचे तृणपर्ण मी?
स्थितप्रज्ञ योगी बुद्ध की
नुसताच हतबुद्ध मी…
भूतभविष्यात लोंबणारा
की वर्तमानी रुद्ध मी?
षडरिपूंचा जोखडी जीव की
अनादि अनंताचा प्रवासी मी…
धारणेची स्वयंभू नीव की
धारणेची स्वयंभू नीव की
नित्य इथलाच निवासी मी?
तर्कट स्खलनशील की
स्वाध्यायी कोहम मी…
प्रज्ञेने प्रकटलेला की
नि:संदर्भ सोहम मी?
सागर प्रपात ओहोळ की
मुक्त प्रवाही झरा मी…
ओसंडून वाहणारा की
शुष्क साचलेला खरा मी?
प्रतिमेत अडकलेला सिंह की
पानगळीस भ्याला ससा मी…
भासतो तसाच आहे की
आहे खरोखर कसा मी?
रविवार, २९ मार्च, २०१५
बुधवार, २५ मार्च, २०१५
मंगळवार, २४ मार्च, २०१५
शनिवार, २१ मार्च, २०१५
रविवार, १५ मार्च, २०१५
शुक्रवार, १३ मार्च, २०१५
बुधवार, ११ मार्च, २०१५
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)









