रविवार, २३ सप्टेंबर, २०१८

बाजार...!


image source - NFS

कुणाची साद आली मोकळ्या रानावनातून
सादेस प्रतिसादावे कसे, तटबंदी भोवताली!

दगड असो रस्त्यातला वा दृश्य ते रमणीय
जिथे मार्ग थांबला तिथेच समाधी लागली!

प्रत्येक श्वासास होती न जाणो कुणाची ओढ
भटक्यास का लाभावी झावळ्यांची सावली!

हे शहर नव्हे, बाजार जणू मांडलेला सर्वदूर
जाहिरात इथे वाहतसे माणसांच्या पखाली!

प्रज्ञेसही ना चुकती आवर्तने उत्पत्ती-लयाची
अखंड प्रतीक्षेचा शाप सुभग दृष्टीच्या भाळी!

सूत्र जगण्याचे शिकविती न कुणी अडाण्यास
स्वार्थही न उमजे जया तो तरेल कळीकाळी?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा