रविवार, ९ सप्टेंबर, २०१८

खजिना...!


विंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त आपण येथे विंदांच्या दैवी प्रतिभेचा साक्षात्कार मुख्यतः पद्य स्वरूपात बघितला. त्यात काही स्फुटं आणि ललितं देखील आले असतील. तथापि खुद्द विंदांच्या हस्ताक्षरातील त्यांनी त्यांचे सुहृद पंडित भीमसेन जोशी यांना 'पद्मविभूषण' मिळाल्याबद्दल मार्मिक अभिष्टचिंतन करतांना लिहिलेले हे स्नेहपत्र कुठल्याही साहित्यप्रकारात मोडत नसल्याने 'आऊटस्टँडिंग' ठरते आणि या विंदा भांडारातील सर्व रत्नांचा सरताज असा कोहिनुर 'ट्रेजर' म्हणून शोभते. ज्यांच्या निरंतर स्नेहाशीर्वादाने मी रोज नव्याने लिहू धजावतो अशा माझ्यावर नि:स्सीम आणि निरपेक्ष प्रेम ('माया' म्हणणार होतो पण 'तिला' भलतेच आयाम आहेत!) करणाऱ्या मानवसमूहाचे नि:संदिग्ध आणि समर्थ नेतृत्व करणाऱ्या जळगावच्या श्री. प्रदीप रस्से सरांच्या सात्विक सौजन्याने या खजिन्याचा लाभ 'इत्यादी'ला झाला असल्याने खरे तर त्यांचे आभार मानावे असे रीत सांगते. परंतु रीत संभाळण्यापेक्षा मनमीत सांभाळणे मला नेहमीच अधिक श्रेयस्कर वाटत असल्याने मी, माझ्या इतर अनेक हितचिंतक सुहृदांप्रमाणे, रस्से सरांच्या देखील ऋणातच राहू इच्छितो; 'उतराई' होण्याच्या अट्टाहासापेक्षा लेखनसाधनेत आणि एकूणच कर्तव्यात 'कुचराई' करू नये हीच खरी कृतज्ञता! मला विश्वास आहे की माझ्या या भावनेशी माझे सर्व स्नेही देखील सहमत होतील... 

शुभम भवतु I

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा