मला माझ्यातूनच आता मुक्ती हवी आहे,
जाणीव जुनी, जगण्याची सक्ती नवी आहे!
बाजार माणसांचा विकण्यास शील सजलेला,
प्रजाती तीच असली तरी ही व्यक्ती नवी आहे!
कोंडला त्याला बडव्यांनी खोल गर्भगृहात,
नव्या भाविकांची प्रभावी भक्ती नवी आहे!
जिंकण्यास युद्ध येते अजून कृष्णनीतीच कामी,
साम-दाम-दंड-भेद जुनेच पण युक्ती नवी आहे!
फासे पटावरील ओळखीचे भासता परंतु,
आता जिंकणारी मायावी शक्ती नवी आहे!
मला माझ्यातूनच आता मुक्ती हवी आहे,
जाणीव जुनी, जगण्याची सक्ती नवी आहे!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा