असंगाशी संग I प्राणाशी गाठ I
भरला काठोकाठ I पापकुंभ II
येई तारण्या I म्हणे युगंधर I
तो ही धुरंधर I संभ्रमित II
स्वार्थांध सत्ता I हेच एक सत्य I
ओशाळते नित्य I माणुसकी II
अधर्मी धर्म I राहतो उदास I
त्याचा अदमास I कुणालागी II
सारेच संत I सदाच दसरा I
चेहरा हसरा I अगतिक II
वाढो मानव्य I विवेकी जागृत I
प्रवाही पण मृत I दैवगती II
रंगात रंगूनी I ठोकली हाळी I
आली आली होळी I धूळधाण II
उन्हां कधी लाभो I भाग्य सावलीचे I
आर्त माऊलीचे I ऐकावे गा II
मार्मिक+हृद्य !👍🌷
उत्तर द्याहटवाप्रेरणा आपलीच, त्याबद्दल आभार...!
हटवा