इवलेसे आयुष्य
जगण्या काय हवे…
शुभेच्छांचे बळ अन
जीवलगांचे थवे…
पुस्तक मनोज्ञ वाचता
विचारांना पंख नवे...
कवितेच्या मुग्धतेत
उडणे सावरी सवे…
उगाच बघता कधी
जे भवति ना भवे…
उन्मादल्या मनासाठी
पापणी ओली लवे…
घडविण्या जे आवडे
स्वप्न त्याचे व्हावे
क्षण क्षण आयुष्य
चिंब पावसात न्हावे…!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा