एक क्षण हसण्याचा
एक क्षण फसण्याचा
एक क्षण उन्मनी
एक क्षण बेमानी
एक क्षण तोडण्याचा
एक क्षण जोडण्याचा
एक क्षण स्वयंभू
एक क्षण दग्दभू
एक क्षण वाहवण्याचा
एक क्षण राहवण्याचा
एक क्षण निरंतर हवा
एक क्षण लुप्त व्हावा
एक एक क्षण जगून घे
भाव सगळेच भोगून घे
क्षणिक नाते क्षणांशी क्षणांचे
क्षण विरता हाती उरती साचे...!
जीएंच्या ८९ व्या स्मृतिदिनास अर्पण.
जीएंच्या ८९ व्या स्मृतिदिनास अर्पण.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा