डोळे मिटता सामोरे, पंढरपूर हे साक्षात I
मन तृप्तीत भिजून, पाही संतांचे मंदिर II
पहिली पायरी नामदेव, दुसरी असे कुंभार I
एकनाथ झाले द्वार, संगे उभे तुकाराम II
जना - मुक्ताई - बहिणा झाल्या तुळशीच्या माळा I
वर कळस झळाळे, सोनियाचा होऊनी ज्ञानदेवा II
मंदिरी उभा विठू, करकटावरी I
डोळ्यातून वाहे आता इंद्रायणी, चंद्रभागा II
आषाढी एकादशीच्या भक्तिपूर्ण शुभेच्छा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा