अबोल झाली सतार
आणि मूक संवादिनी,
नाते सुरांशी तव जसे
शब्द शब्द गुंफुनी...
शब्दप्रभूच्या विरहात
निस्तब्ध आज लेखणी
विव्हल भावगीत अन
करुण अधिक विराणी...!
मराठी गीत-संगीतातील शब्द, भाव आणि सूर यांचा
‘देव’
असलेल्या ‘यशवंत’ स्वरसाधकास शतश: नमन!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा