उरला केवळ दंभ I लोकशाही II
घोडे चौफेर उधळता I बाजारास ये उधाण I
सांडास अवताण I त्राही त्राही II
प्रतिके अन प्रतिमान I सारेच बदलून वेष I
पोसती प्रच्छन्न द्वेष I बारमाही II
सामर्थ्याचे प्रतिक I वैराग्य घेई ओढून I
राज्य सत्ता सोडून I शोक नाही II
अनिर्बंध सत्ताकांक्षा I नाही रोक टोक I
हतबुद्ध अ-शोक I भारवाही II
नावे त्याच्या प्रतिमा I कारुण्यमूर्ती राजस I
होता स्पर्श तामस I रौद्र दाही II
दर्शनी क्रुद्ध भाव I भयप्रद त्रिमिती I
अदृश्य चौथी मिती I ठोकशाही II
तरी सारे आलबेल I म्हणे हेच रामराज्य
बाकी सारे सारे त्याज्य I लवलाही II
अतिशय समर्पक
उत्तर द्याहटवा