जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना १५ ऑगस्ट १९९० रोजी करण्यात आली. यात जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. या विद्यापीठाच्या स्थापनेनतंर काही वर्षांनी विद्यापीठाला कवयत्री खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी अनेक आंदोलनेदेखील करण्यात आली होती. या पार्श्वभूमिवर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव देण्यात येत असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात केली. बातमी वाचा.
या निमित्ताने मुख्यमंत्री महोदयांचे अभिनंदन व आभार आणि
माझी माय सरसोती बहिणाबाईंचे अभिवादन व स्मरण...!
माझी माय सरसोती बहिणाबाईंचे अभिवादन व स्मरण...!
माझी माय सरसोती माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी किती गुपित पेरली !!
माझ्यासाठी पांडुरंग तुझ गीता – भागवत
पावात समावत आणि मातीमधी उगवत !!
आरे देवाचं दर्सन झालं झालं आपसुक
हिरीदात सुर्याबापा दाये अरुपाच रूप !!
तुझ्या पायाची चाहूल लागे पानपानांमधी
देवा तुझ येनजान वारा सांगे कानामधी !!
फुलामधी समावला धरत्रीचा परमय
माझ्या नाकाले इचारा नथनिले त्याचं काय !!
किती रंगवशी रंग रंग भरले डोयात
माझ्यासाठी शिरिरंग रंग खेये आभायात !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा