छायाचित्रे - मिलिंद क्षीरसागर, संस्थापक, शिवाजी ट्रेल, पुणे
उंची न गाठू आम्ही बसूनी
इतिहासाच्या खांद्यावरही
मिरवू खुजेपणाच आमचा
वटवृक्षाच्या
फांद्यांवरही II १ II
आम्ही सेवक, दास आम्ही
श्रेयाच्या सुंदोपसुंदित
मग्न
संस्कृती आमची शान असे
भले उरली छिन्न
विच्छिन्न II २ II
आबाळ बळीराजाची होता
पीके नासली दूध ते सांडले
धनिकांची वाढे संपत्ती अन
खड्ड्यांनी बहुतांस कांडले
II ३ II
कोण राजे नी कोण महात्मा
आम्हां त्यांची कशास
पत्रास
जातीपातीचे आम्ही
सत्तार्थी
घेतो संख्याबळाचा अदमास
II ४ II
जाणता आमचा राजा तो अन
गुरु आमचा असे तथागत
बुद्ध
स्थाने मैदाने रस्ते
नावाजू भले
पुकारित आम्ही आपसात
युद्ध II ५ II
आज्ञापत्रे आम्हांस न उमजती
विसरलो मूर्ख लक्षणे कधीची
दुर्योधनाचे वारस आम्ही
अन
ऋषीचे कूळ आमच्या दधीचि
II ६ II
मुलुखमैदान म्हणुनी
मिरवल्या
तोफांचा आज उपयोग अक्षम्य
आभाळाएवढे दुर्गवैभव
पोरके
वाद ‘भलत्याच’ उंचीचे अगम्य
II ७ II
असामान्य राजा रयतेचा
'दुर्गवैभव' त्याची परंपरा
जपू या ‘आज्ञे’ने त्याच्या
'दुर्गवैभव' त्याची परंपरा
जपू या ‘आज्ञे’ने त्याच्या
पुतळ्याची उंची विसरा II
८ II
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा