तोल जातो जरासा, विखार मात्र फार नाही
लढण्यात त्यांच्या अजून त्वेष तो यार नाही
जिंकण्याचे निकष इथले समजवावे कसे तुला
काळीज चिरणारा कधी केलास तू वार नाहीमंथनातून उगवलेले निषिद्ध सर्वांस हलाहल
पचविलेस नीळकंठा पण तुझी ती हार नाही
युद्धांस सज्ज होऊन तू परजलीस शस्त्रे खरी
युद्धांस सज्ज होऊन तू परजलीस शस्त्रे खरी
गंजल्या
शस्त्रास पण कापणारी धार नाही
असे ओसंडावे शुभ्र चांदणे सोडीत धुम्रवलये
पण ठासून उडवावा असा तो हा बार नाही
लौकिकास ज्यांच्या भिऊनी वैर ना तु घेतले
त्यांच्या यादीतली ही ती माणसे चार नाही
सांगावी सारी घुसमट एकदाच जगण्याची
एवढाच आहे बस बाकी खयाल फार नाही
शोधिशी कुणाला अन हाक देता येईल कोण
आत घेण्या तुला उघडणार एकही दार नाही
जाणारा थांबेल कुणी अन म्हणेल काय कसे
आत घेण्या तुला उघडणार एकही दार नाही
जाणारा थांबेल कुणी अन म्हणेल काय कसे
विचारेल खुशाली तो हा वडाचा पार नाही
आहार निद्रा भय मैथुन पशुसम जीवनमान
आहार निद्रा भय मैथुन पशुसम जीवनमान
उत्क्रांत जगण्याचे उरले एवढेच सार नाही
ऐकतो, पाहतो, मुक्यानेच अनुमोदन देतो
म्हणून त्यांच्या लेखी अजून मी ठार नाही
आरती नैवेद्य मंत्रपुष्प वाहून सारे जाहले
त्याच्या अनुग्रहाचा म्हणे आज वार नाही
करण्या बोन्साय माझा दुनिया आसुसलेली
पण पारंब्यांचा मला मुळी होत भार नाही
म्हणून त्यांच्या लेखी अजून मी ठार नाही
आरती नैवेद्य मंत्रपुष्प वाहून सारे जाहले
त्याच्या अनुग्रहाचा म्हणे आज वार नाही
करण्या बोन्साय माझा दुनिया आसुसलेली
पण पारंब्यांचा मला मुळी होत भार नाही
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा