शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०११

भवेत...!


दिवा वा यदि वा रात्रो

विघ्न्शान्तिर्भविष्यति I

नर नारी नृपाणान्च

भवेत दु:स्वप्ननाशनंम II

गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०११

पाडवा...!पहाटवारा उटण्याचा सुगंध


कोमल स्पर्श अन अभ्यंग


सुरेल स्वरांची साथसोबत


गौरव सहजीवनाचा अभंग...!

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०११

सचोटी...!


गजान्त वैभव

सोन्याचे पाऊल

सचोटीच्या दारी

लक्ष्मिची चाहूल...!

मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०११

विश्वप्रार्थना...!


हर्ष-खेद, उन्माद-विवेक

विषाद आणि वंचना...

'तमसोमाज्योतीर्गमय'

एवढीच विश्वप्रार्थना...!

सोमवार, २४ ऑक्टोबर, २०११

प्रदीप...!?!


दारी रांगोळी गगनी दिवा

रीत जुनी उन्मेष नवा

तमाने प्रदीप ल्यावा

सौहार्द्राचा मंत्र व्हावा...!

रविवार, २३ ऑक्टोबर, २०११

रात्र...!


अस्फुट आवेगाचा पापुद्रा

अन गंधमंत्रित गात्रं

आकंठ अतृप्ततेच्या किना-यावर

रेंगाळलेली रात्र...!

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०११

निलय...!?!


दोन अर्धवर्तुळ की

एक संपूर्ण वलय...

स्वातंत्र्याची धुंदी की

स्वकेंद्रित निलय...!?!

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०११

नेमस्त...!


असणे, नसणे

उगाचच हसणे

दुनियादारीला

नेमस्त फसणे...!

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०११

फसवणूक...!


त्यांनी मला विचारलं

तू काही करत का नाहीस...

मी उत्तरलो नाही कारण

मी स्वत:ला कधी फसवत नाही...!

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०११

दीक्षा...!


तुझ्याशिवाय जगणं

जणू एक शिक्षा आहे...

आयुष्य म्हणजे तुझा अभ्यास

तू दिलेली दीक्षा आहे...!

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०११

गाभारा...!


अपेक्षांचे ओझे अन

जाणीवेचा धुमारा

भरगच्च मनाचा

रिकामा गाभारा...!

रविवार, १६ ऑक्टोबर, २०११

सरी...!


कधी कधी

कुठेतरी...

गर्भरेशमी घननिळ्या

सरी वर सरी...!

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०११

अक्षरप्रिती...!


तुझी नि माझी अक्षरप्रिती

कधी कुणीही केली नव्हती...

अनवट या अक्षत वाटेवर

तू माझी मी तुझा सांगाती...!

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०११

उपेक्षा...!


फुलाने फक्त दरवळावं

ही प्रत्येकाची अपेक्षा...

रंगाबद्दल औदासिन्न्य

ही फुलाची खरी उपेक्षा...!

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०११

बाणा...!


भावनांचे भरीस

भूमिकेची कुचंबणा

मन नाही कह्यात अन

स्वाभिमानी बाणा...!

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०११

स्पर्श...!


उल्हास, उन्मेष, अनुभूती

प्रवास, जल्लोष अन हर्ष...

ओसंडत्या भावनांचा पूर

तरी जाणीवेला द्रोहाचा स्पर्श...!

बुधवार, ५ ऑक्टोबर, २०११

गंध...!


कधी कधी माझ्या श्वासाला

तुझा गंध जाणवतो...

अन एकट्या जाणीवेने

वेडा डोळा पाणावतो...!

रविवार, २ ऑक्टोबर, २०११

छंद...!


संभावितांच्या गप्पात

भ्रष्टाचार निंद्य आहे...

गांधीवादावर 'बोलण'

आमचा मनस्वी छंद आहे...!

शनिवार, १ ऑक्टोबर, २०११

हितेच्छू...!


त्यांच्या या दुनियेत

परका मी झालो आहे...

'हितेच्छू'च्या भाऊगर्दीत

पोरका मी झालो आहे...!