गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०१४

ग म भ न…! 

अक्षरांचे मोती शब्दांची रत्ने 

छंद वृत्त आम्हां जडजवाहीर 

भाषेचा शेला लेवून सजतो 

माझ्या मराठीचा शिवशाहीर…!

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०१४

हीण...!


कोण करितो उठाठेव

असावे कि नसावे…

रोज नव्या उमेदीने

जुनेच हीण कसावे…!

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०१४

साथ...!

 

फुलासम मोहरलो
तुझ्यासवे बहरलो
तुला वजा करता
मी कुठे उरलो…!

मुग्ध कधी गहिवरलो
पक्ष्यासम विहरलो
तुझ्या साथीने
मी कधी सावरलो…!

उगा कधी थरथरलो
सहेतुक बावरलो
तुला जिंकूनही
मी कसा हरलो…!

रविवार, २ फेब्रुवारी, २०१४

धर्म...!


आपापला स्वार्थ जपणे

इथला एकुलता धर्म आहे

कणाहीन 'यशस्वी' जगण्याचे

इतुकेच मर्म आहे…!