सोमवार, २८ एप्रिल, २०१४

खांदा...!


वाऱ्यावर नि:संदर्भ डूलण्याचा

वसा रानफुलाकडून घ्यावा

थाऱ्यावर नसले मन तरी

रडण्याला खांदा द्यावा…!

रविवार, २७ एप्रिल, २०१४

उपभोग…!


हरवलेल्या वाटांना

नकाशाचा काय उपयोग

जाणीवाच नाकारल्यावर

शिल्लक फक्त उपभोग…!

गुरुवार, २४ एप्रिल, २०१४

झाकोळ...!

 

आळसावलेल्या गढूळ संध्याकाळी

आंबल्या वेळांचे भक्क गुच्छ रांगलेले

निरवतेने नटलेल्या भिंतींचा झाकोळ

अन गल्लीत अंधार-दिवे टांगलेले…!

सोमवार, ७ एप्रिल, २०१४

वाट...!


रस्ता कसाही असला तरी

वाट कधी चुकू नये

वेगाने धावतांना

विवेकाला मुकू नये…!