रविवार, २६ जून, २०१६

मैत्र...!


ते धुके अवेळी होते
की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या
निष्पर्ण तरुंची राई...!

सखा सन्मित्र दिनेशला वाढदिवसाच्या भावविभोर गूढरम्य शुभेच्छा! 

शब्द: ग्रेस

गुरुवार, २३ जून, २०१६

भाषा...!


अश्रूंची भाषा कळे तो
पापणी भिजून ओली
विखुरल्या जगण्यास त्या
ना संवेदना ना खोली...

रविवार, ५ जून, २०१६

शांतता...!


सहज संयत सोज्वळ सुलभ
अभिनयाची मुग्ध परिभाषा…
असिधाराव्रताची सांगता होता
दाटून येती कंठ, नभ अन दिशा…!

अभिनयाचे एकमेवाद्वितीय उत्तुंग आणि मृदुल विद्यापीठ असलेल्या सुलभाताईंना भावपूर्ण शब्दसुमनांजली!