शुक्रवार, ३० मे, २०१४

सलाम...!

त्यांना विकत घेऊ न शकला 

दुनियेमधला दाम… सलाम!


गुरुवार, २९ मे, २०१४

वारू...!


अपराधाचा अर्थ उमगण्या

आयुष्य वेचावे लागले…

वारू उधळायचेच होते,

तरी लगाम खेचावे लागले…!

शुक्रवार, २३ मे, २०१४

विषाद...!

 

जाणीवेने स्वप्नांना कधी

ओळखूनही जागवले नाही

जगण्याने ओरखडले तरी

स्वप्नांनी नागवले नाही…!

मंगळवार, २० मे, २०१४

ऋण...?

ऋणात ज्यांच्या रहावे

त्यांना रुचणार नाही

जेव्हढे लिहू जमते

तेही सुचणार नाही…! 
 

~ सन्मित्र दिनेशच्या चिकाटी अन स्नेहाला अर्पण ~

रविवार, १८ मे, २०१४

दे टाळी...!

 

जगण्याचे होता ओझे

मध्येच थोडा श्वास घ्यावा

खळाळून हसतांना 

टाळीसाठी हात द्यावा…!

शुक्रवार, ९ मे, २०१४

सलाम...!

एकदा तूही भिडव डोळे जगाशी

रोज झुकणे पाप आहे, विनय नाही...! 

सोमवार, ५ मे, २०१४

भार...!

 

इवलीशी कविता माझी

हात पकडून म्हणते कशी

दे भार माझ्या खांद्यावर

तरून जाशील झट-दिशी…!

गुरुवार, १ मे, २०१४