बुधवार, २६ जून, २०१३

शुभेच्छा...!

 

आयुष्याच्या वेलीवर

सुखदु:खाची फ़ुले…

योगाच्या हिंदोळ्यावर

भोग अभोग झुले…!

"सन्मित्र दिनेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा!"

शुक्रवार, २१ जून, २०१३

नेमस्त...!

 
 
एखाद्या चुकार क्षणी
 
झुगारून नेमस्त ढोंग
 
चिंतावे संपते कसे
 
जन्माचे टुकार सोंग…!

गुरुवार, २० जून, २०१३

भागधेय...!

 
जगण्याचे भान येता
 
कविता मिटावी… नि:शब्द
 
मर्त्य देहाचे भागधेय
 
हाती ज्याच्या ते… प्रारब्ध!

गुरुवार, १३ जून, २०१३

हुरहूर...!

 
प्रत्येक गोष्टीला म्हणे
 
कधीतरी अंत आहे
 
हुरहूर त्यात मोडत नाही
 
याची मात्र खंत आहे…!

शनिवार, ८ जून, २०१३

लक्तरे…!

 
संदर्भांच्या गुंत्यात
 
गतकाळाची लक्तरे
 
नव्याने जगण्यास आता
 
भान हरपावे फक्त रे…!