सोमवार, २५ जुलै, २०१६

प्रच्छन्न...!


तू भुकेला भावाचा
भान हे हरवू लागले
तुझ्या नावाच्या गजरात
हे कोण मिरवू लागले...!

विवेकी वर्तनास 'अधर्मी'
म्हणूनी हिणवू लागले,
धर्माच्या सचोटीस पुन्हा
यश खुणावू लागले...!

निर्गुण निराकाराचे
ध्यान लोप पावू लागले
सालंकृत भक्तिमार्गी
अध्यात्म धावू लागले...!

प्रच्छन्न सगुणत्व तुझे
नव्याने जाणवू लागले,
उन्मादी उत्सवात अंगी
त्रिगुण बाणवू लागले...!

शुक्रवार, १५ जुलै, २०१६

विठ्ठल...!


डोळे मिटता सामोरे, पंढरपूर हे साक्षात I
मन तृप्तीत भिजून, पाही संतांचे मंदिर II

पहिली पायरी नामदेव, दुसरी असे कुंभार I
एकनाथ झाले द्वार, संगे उभे तुकाराम II

जना - मुक्ताई - बहिणा झाल्या तुळशीच्या माळा I
वर कळस झळाळे, सोनियाचा होऊनी ज्ञानदेवा II

मंदिरी उभा विठू, करकटावरी I
डोळ्यातून वाहे आता इंद्रायणी, चंद्रभागा II

आषाढी एकादशीच्या भक्तिपूर्ण शुभेच्छा!

रविवार, १० जुलै, २०१६

ओंजळधारा...!


एक क्षण हसण्याचा 
एक क्षण फसण्याचा
एक क्षण उन्मनी 
एक क्षण बेमानी
एक क्षण तोडण्याचा
एक क्षण जोडण्याचा
एक क्षण स्वयंभू 
एक क्षण दग्दभू
एक क्षण वाहवण्याचा
एक क्षण राहवण्याचा
एक क्षण निरंतर हवा
एक क्षण लुप्त व्हावा
एक एक क्षण जगून घे
भाव सगळेच भोगून घे
क्षणिक नाते क्षणांशी क्षणांचे
क्षण विरता हाती उरती साचे...!

जीएंच्या ८९ व्या स्मृतिदिनास अर्पण.

सोमवार, ४ जुलै, २०१६

बीते जमाने...!


उठ जाता हूं भोर से पहले, सपने सुहाने अब नही आते...
मुझे स्कूल न जाने के बहाने नये बनाने नही आते...!

कभी पा लेते थे घरसे निकलतेही मंजिलोंको...
अब मीलों सफर करकेभी, ठिकाने नही आते...!

मुंह चिढाती है खाली जेब महीनेके आखिर में...
बचपनकी गुल्लकमें अब पैसे बचाने नही आते...!

यूं तो रखते हैं बहुतसे लोग पलकोंपर मुझे...
पर युंही कोई गोदीमें उठाने नही आते...!

माना की जिम्मेदारियोंकी बेड़ियों में जकड़ा हूं...
बचपनकी तरह छुड़वाने दोस्त पुराने नही आते...!

बहला रहा हूं बस दिलको बच्चोंकी तरह...
जानता हूं, फिरसे बीते जमाने नही आते...!

- अंजान -