रविवार, २९ एप्रिल, २०१२

उडान...!

 

मंजिले उन्हीको मिलती है

सपनोंमे जिनके जान होती है...

पंख होनेसे कुछ नही होता

हौंसलोसे उडान होती है...!

उत्तर-रात्र...!


उत्तर-रात्र सरली तशी

फुटू लागली पहाट

परिवर्तनाच्या चाहूलीने

फिरू लागला रहाट...!

शनिवार, २८ एप्रिल, २०१२

सुन्न...!शुद्ध बावनकशी यशाला

विद्ध काळीमा सुतकी

प्रेम-श्रद्धेहून थोर सत्ता

सुन्न कारकीर्द शतकी...!

मंगळवार, २४ एप्रिल, २०१२

अक्षय्य...!


सोन्याचा दिवस

दागिन्यांच्या राशी

भाव तैसा देव

ज्याचा त्याच्यापाशी...!

रविवार, २२ एप्रिल, २०१२

कल्हई...!


जीवनेच्छा 
गर्भज्ञ स्वयंभू
अजूनहि 
तितकीच माझी

त्यांच्या दिव्यावर
काजळी फार 
झाकोळ की
कल्हई ताजी...!

शनिवार, २१ एप्रिल, २०१२

निर्माल्य...!


फुलायचे...

राहून गेले

निर्माल्य...

वाहून गेले

गुरुवार, १९ एप्रिल, २०१२

दिलासा...!


भगभगीत ग्रीष्माला

दिलासा सोनपावसाचा

जळजळीत विषादांना

आधार नवउन्मेषाचा...!

रविवार, १५ एप्रिल, २०१२

मनबावरा...!


पहाटवारा

सुखावलेला

मनबावरा

दुखावलेला...!

बुधवार, ११ एप्रिल, २०१२

निर्व्याज...!


वेचली ती फुले

टोचले ते काटे

निर्व्याज भावनेला

निर्वाहाचे फाटे...!

शनिवार, ७ एप्रिल, २०१२

कालचक्र...!


कालचक्राच्या व्याप्तीत

इवलासा बिंदू मनुष्य

मायेच्या भ्रमात व्यर्थ

जन्म-मरण-आयुष्य...!

बुधवार, ४ एप्रिल, २०१२

सृजन...!


सदिच्छेला योजन नाही

आरंभाला नाही अंत...

सुज्ञ सृजनच्या भाळी

वांझोट्या समीक्षेची खंत...!

रविवार, १ एप्रिल, २०१२

पहाट...!


धुक्यात हरवली वाट

निरव किलबिलाट  

रात्रगर्भित पहाट

आसुसलेली...!