गुरुवार, २८ मार्च, २०१३

नक्की...!

 
लेखणीला माझ्या भावनांची
 
ओळख इतकी पक्की आहे
 
'विवेक' लिहिता 'आवेग' उमटेल
 
अेवढे अगदी नक्की आहे…!

रविवार, २४ मार्च, २०१३

वीण…!

 
कोलाहल खूप झाला
 
श्वास कोंडू लागे
 
वीण सुटू लागता
 
उसवतात रोज धागे…!

गुरुवार, २१ मार्च, २०१३

नशा...!

 
कुणाला श्वासाची
कुणाला ध्यासाची
कुणाला नशा लागे
आंधळ्या भक्तीची
 
जागेपणी निद्रिस्त
मुक्त तरी बंदिस्त
जगण्याला शिक्षा
भोगण्याच्या सक्तीची...!

बुधवार, २० मार्च, २०१३

शिमगा…!

 
सुबुद्ध आणि सुज्ञ
भरडीले अनंत
मदांध प्रजा
संत म्हणते...
 
अध्यात्माचा सूर
अनास्थेचा पूर
अपार तृष्णेची
खंत कण्हते…

सोमवार, १८ मार्च, २०१३

शृंगार...!

 
जगण्याचे होता ओझे
 
झुगारावे मीच मजला
 
शृंगारच जिथे माझा
 
चितेवर रोज सजला…!

बुधवार, १३ मार्च, २०१३

पाय...!

 
रंगरूप दिसती वेगळे तरी
 
जन सारे एकाच जातीचे
 
प्रतिमा भासती भिन्न परी
 
पाय सगळ्यांचे मातीचे…!

रविवार, १० मार्च, २०१३

रोग…!

 
भोपळा भ्रमाचा
 
भंगूनही फुटे ना
 
रोग हा भोगाचा
 
भोगूनही सुटे ना…!

सोमवार, ४ मार्च, २०१३

माया…!

 
ज्ञान-भान-जाण-प्रज्ञा
 
कित्येक जन्म जागविते
 
मोह-माया-भोग-इच्छा
 
जन्मोजन्मी नागविते…!