गुरुवार, २६ जून, २०१४

शुभेच्छा…!

वय वाढण्याला नको 
खंत सरल्या वर्षाची 
खेद सारे विरून उरो 
जाणीव पूर्ण हर्षाची…!


सन्मित्र दिनेशला वाढदिवसाच्या निरंतर शुभेच्छा…!

बुधवार, २५ जून, २०१४

विरळ...!

 

विरळ गोष्ट आपली

वाऱ्यावर लिहिल्यासारखी

मी सांगितलीच नाही जणू

तू ऐकूनही पहिल्यासारखी…!

गुरुवार, १९ जून, २०१४

'मना'...!

 

श्वास चालू रहाता,

जगण्याची खात्री…

'मना' मोहरण्या हवी

सुहृदांची मैत्री…!

मंगळवार, १७ जून, २०१४

वीण...!


नियतीच्या खुंटीला

नाळ रोज बांधतो

तुटलेली वीण जणू

निकराने सांधतो…!

रविवार, १५ जून, २०१४

झरे...!

 

झरे चंद्रसजणांचे, 
ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, 
झाडांत पुन्हा उगवाया…!

- ग्रेस

बुधवार, ११ जून, २०१४

चूक…!

 

अस्तित्वाच्या देही

जाणण्याची भूक

निर्गुणाच्या मनी

चिंतनाची चूक…!

मंगळवार, १० जून, २०१४

काहिली...!काहिली दोन्ही जीवांची

उन्मनी गंधित होती

तापल्या मातीत विरले 

रेशमी पाऊस मोती…!

शुक्रवार, ६ जून, २०१४

ओळख...!

 

अजून थोडे निजू दे

स्वप्ने थोडी सजू दे

चेहऱ्यांच्या गर्दीत

ओळख थोडी रुजू दे…!

गुरुवार, ५ जून, २०१४

ओले...!

 

पावसाने तन ओले

मन ओले ओथंबले

पहिल्याच पावसात

मन झिम्माड झुले…!

बुधवार, ४ जून, २०१४

उन्मुक्त...!

 

भावविव्हल विरहाच्या रात्री

विचारांवर विवेकाचा पहारा

उन्मुक्त देहभान ओथंबलेले अन 

भोगाला वेदनेचा सहारा…!