सोमवार, ३१ मार्च, २०१४

नवउन्मेष...!

चैत्र पाडवा…

उत्सवाचा गोडवा

जोपासण्या रूढी,

उभारायची गुढी…!


आंब्याचे तोरण,

झेंडूचे रोपण…

रांगोळी दारी,

सणा साजरी…!


नवे वर्ष, नवा हर्ष

नव उल्हासाची लव्हाळी

नवे संकल्प, नवउन्मेष

चैत्र पालवीची नवी नव्हाळी


सकल स्वजनांना गुढी पाडवा अन नववर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!


सोमवार, १७ मार्च, २०१४

रंग मनाचे...!

धुरकटल्या चित्रातही
रंग मनाचे भिजलेले 
गेले जरी दिस उलटून
क्षण जादूई  थिजलेले…! 
सन्मित्र दिनेशला, सर्व आठवणींच्या जतन, संपादनाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद…!

रविवार, १६ मार्च, २०१४

आधार...!


कुठल्या देशी…

कुठल्या वेषी…

कुठल्या रूपांत…

द्येवा तुला शोधू कुठं…???

कवी सुधीर मोघे यांना भावपूर्ण शब्दांजली 
http://sudheermoghe.blogspot.in/

बुधवार, १२ मार्च, २०१४

झेप...!

 

नवी झेप घेण्या
पंख मी पसरता
श्वास का जड त्यांचा
नी विवेकही घसरता…!शनिवार, ८ मार्च, २०१४

विश्वबीज…!

 

आदि ती मायाही तीच

शक्ती तशी भक्तीही…

तिच्या कुशीत विश्वबीज,

अन भोगण्याची सक्तीही…!