रविवार, २४ जून, २०१२

क्षणार्ध...!


सरत्या क्षणाची हुरहूर

येत्या क्षणाची अपेक्षा

गेला कुठे 'हा' क्षण

क्षणार्ध जगण्याची उपेक्षा...!

शनिवार, १६ जून, २०१२

न्यास...!


जगण्याच्या उर्मीला

तगण्याचा ध्यास हवा

मूल्यार्थाच्या गणिताचा

सोयीस्कर न्यास नवा...!

बुधवार, १३ जून, २०१२

चिंब...!


ओथंबल्या गर्भरेशमी

मेघुटाला अनवट कडा

पावसाच्या चाहुलीने

चिंब आठवणींचा सडा...!

सोमवार, ११ जून, २०१२

रानभूल...!


तू तत्व मी माया

तू ब्रह्म मी काया

तू सूक्ष्म मी स्थूल

तू पूर्ण मी रानभूल...!

रविवार, १० जून, २०१२

दंभस्फोट...!


माती शुष्क दाणा दुर्लभ

तहानला पाण्याचा घोट

विषमतेचा बाजार नग्न

होऊ दे एकदा दंभस्फोट...!

रविवार, ३ जून, २०१२

अनाहत...!


ज्ञान बोध प्रचीती

व्रतस्थ साधना मूक

समृद्ध संपृक्त जाणीव

करंटी अनाहत भूक...!

शुक्रवार, १ जून, २०१२

समाधिस्थ...!


उत्कट नखशिखांत

समाधिस्थ तंद्त्रीतून

जाणिवांच्या पलीकडली

झंकारली देहधून...!