शनिवार, ३१ मार्च, २०१२

जादुई...!


अभावित अन अवचित

उल्हसित तसे रोमांचित

उमटले आणिक विखुरले

जादुई क्षण ते मर्मांकित...!

गुरुवार, २९ मार्च, २०१२

आर्जव...!


रात्र थोडी उरलेली

थोडे अजून निजू दे

अर्धोन्मीलित नेत्रातून

पापणी थोडी भिजू दे...!

बुधवार, २८ मार्च, २०१२

हसे...?


आताशा संवेदनेचे

असे काय होते

आपल्याच जाणिवांचे

हसे काय होते...?

मंगळवार, २७ मार्च, २०१२

ग्रेस...!


लंघुनी वेदनेची वेस

निघुनी गेला ग्रेस

प्रतिभा पोरकी

कविता भकास...!

गुरुवार, २२ मार्च, २०१२

गुढी...!


पाडव्याचा

हर्ष नवा

गुढीचा रेशमी

स्पर्श  हवा...!

मंगळवार, २० मार्च, २०१२

शहाणपण...?


त्यागून उसळत्या लाटांचे

भंगुर गहाणपण...

स्वीकारावे तटस्थ किना-याचे

स्थितप्रज्ञ शहाणपण...?

रविवार, १८ मार्च, २०१२

अक्षर...!


धर्म अक्षर अर्थ अक्षर

काम अक्षर अक्षर ईश्वर

अक्षरची सखा प्राण अक्षर

शब्दप्रभूचे लेणे हे नश्वर...!

शनिवार, १७ मार्च, २०१२

जन-गण-मन...!


हुरहूर अन उत्कंठा

उत्सुक वेडे मन

ओझरता  क्षण प्रतीक्षेचा

मार्गस्थ जन-गण-मन...!

बुधवार, १४ मार्च, २०१२

गगनभरारी...!


स्वप्न नवे

रोज हवे

गगनभरारी

घनासवे...!

शनिवार, १० मार्च, २०१२

कविता...!


भावगर्भ

अक्षरधून

अभिव्यक्ती

शब्दातून...!

गुरुवार, ८ मार्च, २०१२

-हास...!


रंगांची उधळण न्यारी

सणाचा बेहोष उल्हास

संस्कृतीच्या जपणूकीतून

अभद्राचा व्हावा -हास...!

सोमवार, ५ मार्च, २०१२

देह्धून...!हुळहुळते अधर

सळसळते रुधीर

झंकारती देह्धून

थरथरते शरीर...!

रविवार, ४ मार्च, २०१२

रितेपणा...!


स्वयंभू क्षुद्रता अन

जन्मजात कोतेपणा

यशोत्सवाने अन्यांच्या

उलटलेला  रितेपणा...!

शनिवार, ३ मार्च, २०१२

अनिर्बंध...!


गुदमरल्या स्वरातले

'मी'चे कण्हणे... विलक्षण

आत्मभानाचे अनिर्बंध

प्रकटणे... विचक्षण!

गुरुवार, १ मार्च, २०१२

निकोप...!


निकोप वाढीपोटी

कसे प्रदूषित फळ

भरकटल्या  माशाला

मोहमायेचा गळ...!