मंगळवार, २७ जानेवारी, २०१५

[Un]Common-man...!


जन्मजात अनाथ माणसां
करून नि:शब्द अन पोरके
निघून गेला मार्मिक हुंकार
आता न व्यंगचित्र बोलके…!

मनस्वी अर्कचित्रकार  अन लेखक आर के लक्ष्मण यांना सद्गदित भावांजली…!

सोमवार, २६ जानेवारी, २०१५

प्रजासत्ताक...!

 

स्वातंत्र्य जन्मसिद्ध हक्क

लोकशाहीचे ठेवता भान… 

प्रजासत्ताक चिरायू होण्या 

संविधानाचा ठेवू या मान …!

रविवार, २५ जानेवारी, २०१५

वाव…!

 

सूर्य भरत नाही जोवर टोल

अन चंद्र करत नाही उठाव

माणूस कितीही ढळला तरी

आहे अजून जगण्यास वाव…!

बुधवार, २१ जानेवारी, २०१५

रिता...!

 
रोज नव्याशा ओंडक्याने
सजवावी आपलीच चिता...
काठोकाठ भरतो प्याला
तरी उरतो तेवढाच रिता...!

रविवार, १८ जानेवारी, २०१५

ध्यान...!

 
 

देवाशी हितगूज करण्यास काल गेलो 
मंदिरात पूर्व संस्कारांच्या सक्तीतून 
बाहेर काढलेले जोडे पळवीणाऱ्याची 
भूक मोठी असावी माझ्या भक्तीहून…!

शनिवार, १७ जानेवारी, २०१५

ओळख...!

 

त्यांच्या खेळात रमण्या
सक्ती ओळख घालण्याची
नाही मुभा जीवास येथे
वाट आपली चालण्याची…!

शनिवार, ३ जानेवारी, २०१५

सचोटी...!


विषमतेची परिसीमा इथे
अन दांभिकता पराकोटीची
नीतीमूल्यांची आहुती घेते
सत्वपरीक्षा रोज सचोटीची…!