मंगळवार, २९ जुलै, २०१४

रोग…!


अस्तित्वाचा शोध

अन जगण्याचे भोग…

'मना'ला विवंचना फार

त्यात सद्‌विवेकाचा रोग…!

शनिवार, २६ जुलै, २०१४

कोंब...!

 

पावसाची नक्षी अन
पागोळ्यांची गाणी…
कोंब नवा फुटता
नव्हाळले पाणी…!

बुधवार, २३ जुलै, २०१४

सृष्टी...!

 

पाऊस वृष्टी
हिरवी सृष्टी
नव्या ऋतूची
नवी दृष्टी…!

शुक्रवार, १८ जुलै, २०१४

सूज्ञ...!

 

सूज्ञ कुठला कळत नाही
डावा कि उजवा मेंदू
बुद्धी चक्रात अडकलेली
अन मन खुशालचेंडू…!

शनिवार, १२ जुलै, २०१४

ह-व्यास...!दुनियेस उरली ना गरज 
कृष्ण, द्रोण न व्यासाची 
भलतेच गुरु अन भोगी मार्ग
इथे संधीला जोड हव्यासाची…!

बुधवार, ९ जुलै, २०१४

भिमेकाठी…!


सोमवार, ७ जुलै, २०१४

नाते...!

 
कृष्ण कबीराशी नाते
'मना' उमजले नाही…
दिवस हातून निसटतांना
रात्रींना समजले नाही…!

शनिवार, ५ जुलै, २०१४

हुरहूर...!

 
 देहमना चिंबवाया 
हव्या सरी वर सरी
ओल्या गर्द हुरहूरिचा
बांध फुटावा नभा घरी…!

बुधवार, २ जुलै, २०१४

राख…!

 

जेवढे शक्य होते

जळून झालो खाक

श्रेयस वा प्रेयस

उरली फक्त राख…!