शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०१४

ॐ महागणाधिपतये नमः ॥

 ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे 

कविं कवीनामुपमश्रवस्तमम् 

ज्येष्ठराजं ब्रह्मणाम् ब्रह्मणस्पत 

नः शृण्वन्नूतिभिःसीदसादनम्

सोमवार, १८ ऑगस्ट, २०१४

अमिट...!

 
मनात माझ्या येतात
घेऊन पक्ष्यांचा वसा...
पंख फुटताच उडून जातात
उमटवून अमिट ठसा…!

शनिवार, १६ ऑगस्ट, २०१४

रज:कण...!

 

वैयर्थ आयुष्याचे उमगले
ज्याला तो एकच बुद्ध…
बाकी सारे जीव रज:कण
निर्बुद्ध अथवा हतबुद्ध…!

सोमवार, ११ ऑगस्ट, २०१४

खात्री...!


 

मृत्यूची खात्री आहे
अन तुझ्यावर विश्वास
बघू या कोण आधी येते 
तू की शेवटचा श्वास…!

शुक्रवार, ८ ऑगस्ट, २०१४

झोके…!

 

देहाच्या बासरीला
षडरिपुंची भोके
उनाड झुळूक येता
मोहवितात झोके…!

मंगळवार, ५ ऑगस्ट, २०१४

माळीण...!घरच काय, गावही
वाहून नेलं पावसाने
तरीही तो बोलवितो
त्याला नेमस्त नवसाने…!

सोमवार, ४ ऑगस्ट, २०१४

किशोरदा...!


आवाजाची मोहिनी अन
भुरळ पाडणारी जादू
त्याच्या गारुडात धुंद 
रंक राव आणि साधू…!

किशोरदा, वाढदिवसाच्या शुभेच्छा… 
तुझ्याशिवाय गाण्यांची कल्पनाही करवत नाही…!

शनिवार, २ ऑगस्ट, २०१४

अस्वस्थ...!

 

भूतकाळात रमण्या मी
थांबलो भेटलो भिजलो
दिव्यत्वाच्या प्रचीतीने
अस्वस्थ अन निजलो…!