शनिवार, ८ सप्टेंबर, २०१८

शाळा...!



"आमचा अहवाल अर्थातच नाकारला गेला, परंतु मी एका सकारात्मक विचारमंथनाला चालना देऊ शकलो याचे मोठे समाधान मिळाले..."

"एकदा का तुम्ही जीवसृष्टीशी जवळीक कमावलीत की कोठेही असा, तुमच्या सभोवती मित्रमंडळींचा गराडा असतो..."

"केव्हाही हताश होऊ नये, आयुष्याच्या समाधानरथाला उत्साहाचे घोडे जोडून, विवेकाचा चाबूक वापरत मार्गक्रमण करत रहावे..."

सर, पर्यावरणरक्षणाबरोबरच यशस्वी, समाधानी आणि संपन्न आयुष्याच्या या त्रिसूत्रीत 'आवडीचा छंद हाच तुमचा व्यवसाय बनवा...' आणि 'श्रेयस आणि प्रेयस एकरूप करा...' ही दोन तत्वे जोडली की, परवाच्या कार्यक्रमात आपल्याकडे 'पंचसूत्री' मागणाऱ्या उत्साही कार्यकर्त्याबरोबरच सर्वच जिज्ञासूंना या 'बिनभिंतीच्या शाळे'तून 'जो जे वांछील तो ते लाहो...' ची अनुभूती येण्यास प्रत्यवाय नसावा. परवाचा जनसंवाद व या लेखाबद्दल आम्ही आपले कृतज्ञ आहोत... आता प्रतीक्षा विधायक उपक्रमाची!

शुभम भवतु I

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा