विंदा करंदीकर या मराठी कवितेस मुक्त आणि जाणती करणाऱ्या कविश्रेष्ठाच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त २४ ऑगस्ट २०१७ पासून सुरु केलेला हा उपक्रम आज समारोपाकडे नेतांना मनात मिश्र भावनांचा कल्लोळ उठलाय. मुळात 'रोज एक कविता' अशा तऱ्हेने कल्पिलेला हा उद्योग ३६५ च्या जागी फक्त शंभराच्या आसपास पल्ला गाठू शकला त्याला अनेक कारणे आहेत, मात्र सबब एकही नाही आणि समर्थन तर मुळीच नाही! 'स्वतःच्या मर्यादांचा आणि आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या घटकांचा स्वीकार' ही सकारात्मक विचारांची पहिली पायरी असते असे मानसशास्त्र सांगते. तेंव्हा तोही प्रयोग राहून गेला असे व्हायला नको म्हणून विंदांच्याच सल्ल्याने 'हा रस्ता अटळ आहे... माझ्या मना बन दगड!' असे म्हणून आयुष्यात स्वीकारव्या(च) लागणाऱ्या असंख्य गोष्टीतील आणखी एकीची भर! तथापि 'मुक्कामाचे ठिकाण हे प्रवासाइतके सुंदर, सुभग आणि उद्बोधक कधीच नसते' या आयुष्यभर जपलेल्या आणि जगलेल्या धारणेचीच प्रचिती या निमित्ताने पुन्हा एकदा आली.
या निमित्ताने 'समग्र विंदां'चा अभ्यास करता आला. ६ कवितासंग्रह आणि बालकवितांसह इतर अनेक संकलने यांचा मागोवा घेतांना, एका मानवी आयुष्यात, विद्यादानाचा वसा सांभाळून, एक व्यक्ती एकट्याने एवढी निर्मिती करू शकते हाच मुळी पहिला धडा होता. छंदबद्ध कविता, छंदमुक्त कविता, त्रिवेणी, मुक्तके, सुनीते, विरूपिका असे वैविध्यपूर्ण पद्य प्रकार आणि निबंध, समीक्षा अशा गद्य साहित्य बरोबरच स्वतःच्या मराठी कवितांचा इंग्रजीत अनुवाद आणि 'पोएटिकस ऑफ ऍरिस्टोटल' आणि शेक्सपिअरच्या 'किंग लियर'चा मराठी अनुवाद तसेच 'ज्ञानेश्वरी' आणि 'अमृतानुभव' अशा अलौकिक रचनांचे आधुनिकीकरण असे मौलिक आणि तात्विक कार्यही विंदांनी यशस्वीपणे पार पाडले आणि वाचकांनी, रसिकांनी त्याचेही स्वागत केले एवढेच नव्हे तर मुक्त कंठाने स्तुतीही केली.
एवढ्या सगळ्या भांडवलावर, 'मिसिसिपीमध्ये मिसळू दे गंगा' असे, 'वसुधैवकुटुंबकम' या अद्वैताच्या वैश्विक तत्वाला निराळेच परिमाण देणाऱ्या आणि सर्वच तऱ्हेने एकमेवाद्वितीय असणाऱ्या या अद्भुत रचनाकाराला 'ज्ञानपीठ' मिळणे ही खर तर फक्त औपचारिकता होती, त्याचा अविस्मरणीय सोहळा झाला तो भारताला आजवर लाभलेल्या राष्ट्र्पतींमध्ये ज्यांना लोकांचे सर्वाधिक प्रेम मिळाले अशा 'पीपल्स प्रेसिडेंट' सर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या अध्यक्षतेमुळे! विंदांनी या प्रसंगी 'मशीन हा विष्णूचा अकरावा अवतार आहे' या संकल्पनेवर आधारित यजुर्वेदातील 'शांतीपाठा'चे 'क्रांतीपाठा'त रुपांतर करणारी त्यांची एक प्रदीर्घ कविता 'यंत्रावतार' सादर केली आणि सर ए पी जे अब्दुल कलाम यांना मराठी शिकण्यास प्रवृत्त केले. लहान मुलाच्या निरागस कुतूहलाने क्लिष्ट मराठीतील 'क्रांतीपाठ' ऐकणारे सर ए पी जे अब्दुल कलाम आणि अस्खलित, खणखणीत उच्चारात तो ऐकवणारे विंदा यांनी भाषेची कुंपणे तर तोडलीच पण प्रच्छन्न विचारांच्या प्रभावी अभिव्यक्तीच्या माध्यमातून 'अभिजात भाषेचा' मुद्दाही निकाली काढला. या प्रसंगाचे साक्षीदार असलेल्यांना विंदांच्या 'तुकोबाच्या भेटी शेक्सपिअर आला...' कवितेतील 'दोघे निघोनिया| गेले दोन दिशा| कवतिक आकाशा| आवरेना||' याची प्रचीती आली असल्यास नवल ते काय! दृष्ट लागावी असा हा सोहळा या भूमीत पुन्हा होईल...?
पोस्ट-ट्रुथ अर्थात 'सत्योत्तर'च्या आजच्या चिंतनीय काळात 'सत्य' या संकल्पनेकडे विंदाच्या दृष्टीकोनातून बघत या उपक्रमाचा समारोप करतोय, विंदांच्या मला सर्वाधिक भावणाऱ्या या दोन रचनांनी... बघा काही पटतंय का?

--------------------------------------------------------------------------------
उतरतीवर उगवणारी सत्यें
उतरतीवर उगवणाऱ्या सत्यांना
उतरतीवर उगवणाऱ्या सत्यांना
पाऊसपाण्याची जरुरी नसते;
नसते जरुरी मृगाच्या गडगडाटाची;
एक दिवस सकाळीं तीं तिथे असतात.
पांच मिनिटें हा काल प्रदीर्घ असतो;
व्यायाम करतांना हें उगवते, समोरच्या आरशांतून.
आपली जीभ आपली नसते;
ती असते पदार्थांना सामील झालेली, एक व्यभिचारिणी.
हे उगवतें शेजारून येणाऱ्या भज्यांच्या वासांतून.
खऱ्या अर्थाने दुसरें कुणीहि आपले नसतें ;
मुलगे सुनांचे असतात, मुली जावयांच्या;
आणि नातवंडे खाऊचीं वा चिऊचीं, क्रिकेटचीं वा टीव्हीचीं.
पण हें बोलायचें नसतें, समजायचें असतें;
आणि वागायचें असतें, समजून न समजल्यागत.
हे उगवतें गार पाण्यानें दाढी करतांना, साबणाच्या फेसांतून.
आतां, तीऽ असते, हें खरें;
पण तीऽ असते म्हणजे आपणच असतों. अर्थ एकच.
स्नेहापुरते स्नेही असतात;
पण तेही उतरतीवरून घसरू लागतात;
कांहीं फसवतात पुढच्या वर्षाचा वायदा करूनहि.
पण आश्चर्याला जागा नसते;
ती शोधावी लागते, सापडली तर आपल्यालाहि बरें वाटतें.
हें उगवतें आपल्या गुडघ्यांना
आपण स्वतःच मॉलिश करतांना, नारायणतेलांतून.
बायकांच्या शरीराची रचना आपल्या मानाने अधिक सोयीची
हें अभावितपणें प्रत्ययाला येतें;
तरीहि परमेश्वर न्यायी म्हणण्याने फारसें बिघडत नाही.
कुणा अकर्म्याला चांगलेपणा लाभत असेल तर लाभूं द्यावा!
हे उगवतें बिछान्यावरून छताकडे पाहतांना
छताला पडलेल्या ओलीच्या डागांतून.
उतरतीवर उगवणारी सत्यें
असत्यांना खिजवीत नाहींत;
मारतात त्यांच्याशी शिळोप्याच्या गप्पा
नुकत्याच निवर्तलेल्या सुप्रसिद्ध सिद्धांताविषयी,
किंवा प्रकृतिविषयीं, स्वतःच्या व त्यांच्याहि.

यथार्थ
सूत्र
सत्य
उतरते जाणणाऱ्याच्या जिभेवर
हलाहालासारखे
आणि
जिभेची चाळण केल्यावर उतरते
खाली पडणाऱ्या पडजीभेवर;
ती
जाळल्यावर शिरते हृदयात हंबरडा फोडण्यासाठी, आवाजाशिवाय!
सत्य
लसलसते वास्तवातला विस्तव
होवून
घेवून
बरोबर हलकटांचा लवाजमा;
जेव्हा
ताबूत जळतात मनातले आणि
उरतात
सांगाड्यांच्या काठ्या घर बांधण्यासाठी
नव्या
नवरीच्या गर्भपाताकरिता.
सत्य
जाते पायापुढे, पायामागून
आणि
वेडावित
पावलांचा आवाज साधित आड;
सवयीच्या
लयीची दोन पर्यायांमधील अनाहत
वाटेने
अटीतटीचा
सामना पहात,
वहात
वहात अर्वाच्याच्या दिशेने.
सत्य
करते आत्म्याशी संभोग
त्याच्या
छळासाठी; म्हणून सत्य,
म्हणूनच
सत्य... स्वातंत्र्याची आहुती
मागणारे!
--------------------------------------------------------------------------------
आव्हान नव्हे, आवाहन! (ही [कुणाचीही] कविता नाही, [माझेच] निवेदन आहे ..!)
आपण आजवर माझ्या फेसबुक भिंतीवर जे काही पाहत असाल त्यातील ९९% हे दुसऱ्या कुठल्यातरी मूळ स्त्रोतावरून, उदा. हा ब्लॉग, प्रकाशित झालेले असते, अगदी क्वचितच मी थेट फेसबुकवर काही लिहीत असतो. फेसबुकने १ ऑगस्ट २०१८ पासून काही धोरणात्मक निर्णय घेतले आणि आपल्या 'शेअरिंग पॉलिसी'मध्ये काही महत्वाचे बदल इथे वाचा केले. सदर बदलांमुळे कुठलीही पोस्ट आता फेसबुकवर थेट आणि आपोआप शेअर होऊ शकणार नाही. तेव्हा आपण जर माझे लिखाण, प्रकटन वाचण्यास इच्छुक असाल तर आपण मला खालील लिंक्सवर भेटू शकता.
http://eetyadee.blogspot.com/
http://ego-wise.blogspot.com/
https://twitter.com/creativemaneesh
http://beacauseorg.wordpress.com
http://in.linkedin.com/in/manishpuranik
https://plus.google.com/+ManishPuranikPMP
आपल्या सोयीसाठी वरील लिंक्स आपण 'बुकमार्क' करू शकता किंवा आपला इमेल पत्ता टाकून 'सबस्क्राईब' करून ब्लॉगवरील प्रत्येक नवीन पोस्ट आपल्या इनबॉक्स मध्ये पोहचण्याची सोय करू शकता तसेच माझ्या ट्विटर, लिंक्डइन, गुगल प्रोफाईलला 'फॉलो' करू शकता. धन्यवाद!

शुभास्ते पंथानः संतु...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा